अंतरगाव शि. येथे जागतिक महिला दिन हा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच राहुल भाऊ वानखडे, स्वागताध्यक्ष ग्रामविकास अधिकारी तळोकार साहेब, गावातील निमंत्रित महिला आंगणवडी सेविका अंतरगाव येथील सौ. सविता दिलीप कथतलकर,सौ. कल्पना प्रमोद उमाळे, राजखेड येथील सौ . सुरेखा प्रकाश साबळे, उपसरपंच सौ. निर्मला संतोष चव्हाण, येरडगाव माजी सरपंच सौ .छाया परशराम नागरे,सी आर पी सौ. आशा उमेश कुटे, महिला ग्रामसंघ अध्यक्ष सौ. मीना विनोद
नागरे, उपाध्यक्ष सौ. संजीवी विनोद कथलकर यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, मा जिजाऊ यांच्या फोटोचे पूजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. ८ मार्च हा महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा त्यांचे हक्क, समानता आणि सशक्तीकरण लढण्याचा संकल्पही आहे. महिलांनी समाजात विविध क्षेत्रांत केलेल्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीचे काम करीत आहे. महिला गेल्या कित्येक शतका पासून संसाराचा गाडा ओढतांना किंवा देशाचा एक जबाबदार महिला मग त्या पायलेट असो अथवा आयुष्याच्या रंग मंनच्यावर ती आपली भूमिका ती चागल्या प्रकारे सादर करते , महिलांनी समाजात एकजूट होऊन निस्वार्थीपणे देशाची सेवा करून नवी क्रांती करावी, महिलांनी वेगवेगळ्या भाषणातून आपल्या विचारातून महिलांना उजाळा दिला .