- प्रा. डॉ. राकेश रामटेके यांचे प्रतिपादन
आज आपण जागतिक महिला दिन साजरा करताना अंतर्मुख होणे गरजेचे आहे. आपल्या सभोवताली स्त्री अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. देशात स्त्री अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. रोज एक- ना, एक स्त्री अत्याचाराची शिकार होत आहे. अशा परिस्थितीत स्त्री पुरुष समानतेचे संस्कार मूल्य हे कुटुंबातूनच रुजविले गेले पाहिजे. कुटुंबात आणि प्रत्येक ठिकाणी स्त्रियांचा आदर सन्मान झाला पाहिजे, महिला आणि मुलींच्या बाबतीत सन्मानाची भावना, भातृत्वाची भावना रुजणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कुटुंबातूनच स्त्री सन्मान संस्कार मूल्य
रुजविण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे विभाग प्रमुख प्रा. राकेश रामटेके यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेतील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने आज अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. विजय घोरपडे, प्रा.शंकर यशोद, प्रा. तथागत सुरवाडे, डॉ. कविता पाटील, डॉ. सुषमा तीनगोटे, योगेश माळी, डॉ. गोपाल पाटील, डॉ. दिगंबर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना स्त्री -पुरुष सामानतेचे प्रतिज्ञा देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजय घोरपडे यांनी तर प्रा. शंकर यशोद यांनी आभार मानले.
यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.