चाळीसगाव: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात अन्याय झाल्याचा आरोप करत, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी कुटुंबासह टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
धनंजय देशमुख यांनी सांगितले की, “माझ्या भावाच्या हत्येप्रकरणी सात जणांना मोका लावण्यात आला आहे, परंतु मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला मात्र मोका लावण्यात आलेला नाही. खंडणी मागण्याच्या प्रकरणातूनच हा वाद सुरू झाला आणि शेवटी माझ्या भावाची हत्या करण्यात आली.”
देशमुख कुटुंबाने स्थानिक पोलिसांवर माहिती लपवण्याचा आरोप करत म्हटले की, “आमच्या कुटुंबाला सत्य परिस्थितीची माहिती दिली जात नाही.”
या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी, धनंजय देशमुख यांनी उद्या सकाळी 10 वाजता कुटुंबासह टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी स्वतःला संपवण्याचा इशाराही दिला आहे.
धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही न्यायासाठी शेवटपर्यंत लढा देऊ.” प्रशासनाकडून अद्याप या प्रकरणी प्रतिक्रिया आलेली नाही.