वैजापूर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क): शिऊर (ता. वैजापूर) येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याचा प्रकार गुरुवारी (९ जानेवारी) समोर आला. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने तिला फसवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.
पारळा (ता. वैजापूर) येथील तरुणी ७ जानेवारीला सकाळी सात वाजता महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. परंतु, ती रात्री घरी परतली नाही. नातेवाईक व मैत्रिणींना विचारपूस केल्यानंतरही ती सापडली नाही. अखेर, वडिलांनी गुरुवारी दुपारी शिऊर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फौजदार चेतन ओगले तरुणीचा शोध घेत आहेत.