(छत्रपती संभाजीनगर दि १२)चलो बुध्द की ओर अभियानाचे मुख्यप्रर्वतक धम्मसेनानी चक्रवर्ती जी.एस.दादा कांबळे यांच्या क्रांतीकारी चळवळीत जडण-घडण झालेला कृतिशील कार्यकर्ता कवि-लेखक-वक्ता सोमनाथ वाघमारे लिखित जी. एस. दादांच्या सहवासात या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार दि १२ जानेवारी २०२५ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ पत्रकार स सो खंडाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बौद्धाचार्य व्ही के वाघ, श्रावण गायकवाड ,डी. व्हि खिल्लारे, सुप्रसिध्द कवि प्रा. देवानंद पवार,सत्यशोधक समाज महासंघचे अध्यक्ष डी.एस. नरसिंगे, डॉ संगीता दोंदे,सोमनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जी एस दादांच्या सहवासातील मित्र मंडळींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या ग्रंथावर भाष्य करताना म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिलिंद महाविद्यालयाच्या भूमीतूनच जी एस दादा कांबळे यांच्यात वैचारिक परिवर्तन झाले. मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीशी जोडून धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी जी एस दादा शेवटपर्यंत सक्रिय होते. आंबेडकरी चळवळीचा इतिहास जी एस दादांनी निर्माण केला. एक धगधगता निखारा म्हणजे जी एस दादा कांबळे. सोमनाथ वाघमारे जी एस दादांचा धम्म चळवळीचा वारसा पुढे नेण्याचे महत्तम काम करत आहे. यावेळी स सो खंडाळकर, व्ही के वाघ,डी.एस. नरसिंगे, डॉ संगीता दोंदे, सोमनाथ वाघमारे यांनीही ग्रंथावर भाष्य केले.प्रास्ताविक राहुल सुरवाडे सूत्रसंचालन पंकज शिंदे तर आभार प्रा गणेश भालेराव यांनी केले. रतनकुमार साळवे, किशोर गडकर, ऍड विजय वानखेडे, एकनाथ त्रिभुवन, गंगाताई सुरडकर, मुकुंद सुरडकर, रामभाऊ पेटकर,धनराज गोंडाणे, डॉ सागर चक्रनारायण आदींसह शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.