छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतीक न्यूज नेटवर्क):रास्तभाव शिधावाटप दुकानांचे परवाने मंजूर करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पंचायत, स्वयंसहायता बचत गट, सहकारी संस्था, महिला गट, तसेच नोंदणीकृत संस्थांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
उपलब्ध दुकानांचे तपशील:
1. रास्त भाव दुकान क्रमांक 122 – अंगुरी बाग, छत्रपती संभाजीनगर
2. रास्त भाव दुकान क्रमांक 123 – पोलीस कॉलनी, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर
अर्ज प्रक्रिया:
अर्जाची विक्री तहसील कार्यालयात सुरू असून अर्जाचे शुल्क 300 रुपये आहे.इच्छुक अर्जदारांनी चलनाद्वारे शुल्क भरून विहित नमुन्यातील अर्ज 31 जानेवारी 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.