परभणी संविधान शिल्प विटंबना प्रकरण
न्यायालयीन कोठडीत लॉ कॉलेजचा सोमनाथ सूर्यवंशी ठरला अत्याचाराचा बळी
परभणी / संजय बगाटे
१० डिसेंबर रोजी संविधान शिल्प विटंबना निषेधार्थ आंबेडकरी समाजाने पुकारलेल्या ११ डिसेंबर रोजीच्या आंदोलनात पोलीसांनी पकडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्याचा न्यायालयीन कोठडीत आज १५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. हा मृत्यु नसून पोलीस अत्याचाराचा बळी ठरला असल्याच्या प्रतिक्रिया समाजात उमटल्या आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्यावर दगडफेकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १४ डिसेंबर रोजी त्याला जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. रात्री त्याच्या छातीत दुखत असल्याचे असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही वार्ता शहरभर पसरताच समाजातील आंबेडकरी नेत्यांनी भीमअनुयायांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली.
या घटने नंतर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल झाले याच दरम्यान आंबेडकर नेत्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन.शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे शवविच्छेदन परभणीत न करता इन कॅमेरा संभाजीनगर औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात करावे अशी भूमिका घेतली. या वेळी विजय वाकोडे आ. राहूल पाटील सिद्धार्थअंबिरे गौतम मुंडे सुधीर साळवे संतोष गुजर राधाजी शेळके
सायंकाळी ४ वाजता रुग्णवाहिकेतून सोमनाथ सूर्यवंशी यांचे शव संभाजीनगर कडे रवाना करण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार शहिद सोमनाथ सूर्यवंशी हा ३३ वर्षीय लॉ कॉलेजचा विद्यार्थी श्री शिवाजी लॉ कॉलेज परभणी येथे शिक्षण घेत होता तो मूळचा पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातील सदस्याला शासकीय नोकरी व त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची मदत मिळावी अशी मागणी आ. राहुल पाटील यांनी केली आहे