परभणी / प्रतिनिधी, समतावादाचा पुरस्कर्ता बौद्ध धम्म आहे. जो वर्ग विहीन दुःख विहीन आहे. याच मार्गाने माणूस घडवला जातो. तो बौद्ध धम्म सर्वांगिक बदल घडवणारी क्रांती असल्याचे प्रतिपादन पूज्य भदंत ज्ञानज्योती महस्थवीर चंद्रपूर यांनी केले कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नागभूमी धम्मगिरी मृगदायवन राणीसावरगाव येथे भिक्खू नाग ज्योती यांच्या नवव्या वर्षा समारोप कार्यक्रम प्रसंगी पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी धम्मदेशना झाली .समाज बदलाचा हा धम्म समाजातील शिक्षित वर्गाने आपल्या खांद्यावर घेउन सदधम्माचा वारसा पूढे न्यावा तरच महापुरुषांना अपेक्षित समता मुलक समाज निर्माण होईल असे ही ते म्हणाले.प्रारंभी नाग भूमी धम्मगिरी मृदायवनचे संकल्पक डॉ परमेश्वर साळवे यांनी प्रास्ताविक केले. विचार मंचावर भदंत धम्मरक्षित (आग्रा), भिक्खू नाग ज्योती, भिक्खू प्रज्ञारत्न शाक्यवंश (आचार्य प्रज्ञा)व भिक्खू संघ उपस्थीत होते.या वेळी डॉ संघमित्रा साळवे, राजेंद्र कांबळे, उत्तम कांबळे, सुनील पवार ,गोपीनाथ कांबळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्रद्धावान धर्म उपासक उपासिका धम्म श्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी बाळासाहेब जंगले नवनाथ साळवे उमाकांत शेंडगे सखाराम मस्के शंकर साळवे आदींनी परिश्रम घेतले.