मध्य मतदार संघात बाळासाहेब थोरात यांना वाढता पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना हा सेवा सुरक्षा आणि विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. याच माध्यमातून आगामी काळात मतदारसंघातील माता भगिनींच्या संरक्षणासाठी लढत राहणार असल्याचे प्रतिपादन उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी केले.
गेल्या पंधरा दिवसांत प्रत्येक वॉर्ड आणि विभागात महिलांनी केलेले औक्षण आणि स्वागत यामुळे भरावून गेलो आहे. त्यामुळे मध्य मतदारसंघात वाढता पाठिंबा नक्कीच विजय प्राप्त करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मीनारायण बाखरिया, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, नारायण कानकाटे, सुरेश व्यवहारे आदी उपस्थित होते.