जयपूर हायकोर्टातील मनुच्या पुतळ्याला काळ फासणाऱ्या धाडसी भीमकन्या आयुष्यमती कांताबाई अहिरे व आयुष्यमती शीलाताई पवार यांचा तक्षशिला बुद्ध विहार येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.एम. राऊत होते, तर सूत्रसंचालन वामनराव खरात यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन अशोक तीनगोटे यांनी केले.
पाहुण्यांचा सत्कार आयुष्यमती बेबीनंद आढवे, उजनावती गायकवाड आणि उषाताई राऊत यांनी केला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने आंबेडकरवादी जनसमुदाय, श्रद्धावान उपासक व उपासिका उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्रा. शंकर ननीर, माधव मोरे, आयुष्मान गडलिंगे, भास्कर लांडगे, आयुष्मान ससाने व आयुष्मान येलदोडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन युवक मंडळाचे राहुल आढावे, जगदीश बिरारे, अनिल गिरी, सम्राट ढोले, सनी काळुंखे, आनंद शिंदे, व अनिकेत कांबळे यांनी केले. या विशेष प्रसंगी कांताबाई अहिरे आणि शीलाताई पवार यांना संस्थेच्या वतीने मानधन प्रदान करण्यात आले.