छत्रपती संभाजी नगर /प्रतिनिधी दि. २४ पोलीस सेवेती कार्यरत असतानाही सामाजिक बांधिलकी जपणारे संभाजीनगर जिल्ह्यातील वीरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
संभाजी नगर जिल्ह्यातील वीरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे पोलीस सेवेत असताना ही त्यांचे सामाजिक कार्यात असलेले योगदान आणि सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी वृत्तीने झोकून देत केलेल्या त्यांच्या कार्याची दखल माणुसकी समूहाच्याच सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेने घेतली आहे.
या माणुसकी समुहाच्या ८ व्या वर्धापन दिना निमित्त आणि कु. लक्ष्मी सुमित पंडीत हिच्या १० व्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रातील सामाजिक, युवा, क्रीडा, कला, पत्रकारिता, आरोग्य सेवा, उद्योग, कृषि, सांस्कृतीक, साहित्य व संगीत, प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या गुणी जणांना सेवागौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते.
पोलीस खात्यातील उत्कृष्ट सेवा करून जनतेशी सुसंवाद आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे. पोलीसा बद्दल सामान्य नागरिकांत विश्वास दृढ केला आहे. या सर्व त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना उत्कृष्ठ सेवा पुरस्कारासाठी निवड केल्याचे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पंडित आणि सचिव पूजा पंडित यांनी देत त्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच एका भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तर या पुरस्कारा बद्दल शंकर वाघमोडे यांचे त्यांच्या हितचिंतक, मित्रमंडळी आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.