‘निळे प्रतिक’ न्यूज नेटवर्क
३ जानेवारी २०२५रोजी आदरणीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस साजरा होत आहे. या महान स्त्रीवादी क्रांतीच्या प्रतीकाच्या जयंतीनिमित्त दैनिक ‘निळे प्रतीक’ विशेषांक प्रकाशित करत आहे. हा विशेषांक संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी प्रसिद्ध होणार असून, सावित्रीबाईंच्या विचारांचा व प्रेरणादायी कार्याचा जागर घालण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आपण आपले लेख, कविता आणि जयंतीनिमित्त शुभेच्छा जाहिराती आम्हाला पाठवून सहकार्य करावे, ही नम्र विनंती. आपल्या लेखनातून आणि शुभेच्छांमधून सावित्रीबाईंच्या योगदानाचा गौरव करण्याची संधी मिळेल.
आपले लेख व जाहिराती कशा पाठवायच्या?
लेख व कविता: सामाजिक विषय, स्त्री शिक्षण, स्त्रीवाद, जातिव्यवस्थेतील सुधारणा यासारख्या विषयांवर आधारित लेख आणि कविता आमच्याकडे पाठवा.
शुभेच्छा जाहिराती: संस्थांच्या किंवा वैयक्तिक स्तरावर सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी शुभेच्छा जाहिराती पाठवाव्यात. लेख व जाहिराती पाठवण्याची अंतिम तारीख: ०१ जानेवारी २०२५
संपर्कासाठी.
nilepratik02@gmail.Com
मोबाईल: 9923502320
सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास व विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले योगदान महत्त्वाचे ठरेल. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल *दैनिक, *निळे प्रतीक* आपले आभारी आहे.