छत्रपती संभाजीनगर | निळे प्रतिक न्यूज नेटवर्क हर्सूलच्या फुलेनगर विहारातून भगवान गौतम बुद्ध यांची पंचधातूची मूर्ती चोरीला गेल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, युवकांनी मोठ्या संख्येने जमून तीव्र निदर्शने केली.
बौद्धाचार्य प्रमोद नवगिरे यांनी सांगितले की, काल रात्री बुद्ध वंदनेनंतर विहार बंद करण्यात आले होते. मात्र, सकाळी साडेसहा वाजता विहारात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी मूर्तीसोबत ३ माईक देखील लंपास केले. १५ ते २० वर्षे जुनी असलेली ही मूर्ती त्या काळी २८ हजार रुपयांना विकत घेतली होती, असे नवगिरे यांनी पत्रकारांना माहिती दिली.